Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

जेजुरी पर्यटन

श्रीक्षेत्र जेजुरी म्हणजे पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. मंदिरे, तलाव व ऐतिहासिक वास्तू यांचा खजिनाच जेजुरी परिसरामध्ये पहावयास मिळतो त्याची हि झलक.........

जेजुरगड

जेजुरगड श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्यानंतर त्याने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्लाचे नाव घेतले जाते तर मणीसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती.

सण - यात्रा - उत्सव

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये सर्वसाधारणपणे वर्षामध्ये सात ते आठ यात्रा भरतात,या व्यतिरिक्त काही खास उत्सव हि साजरे केले जातात.जुन्या ग्रंथांमधून जेजुरीमध्ये वेगवेगळे उत्सव साजरे होत असल्याचा उल्लेख सापडतो परंतु त्यातील वैशाखातील हिंदोळा व फाल्गुनातील टिपरी सारखे उत्सव कालौघात बंद पडले तर काही अजूनही मोठ्या प्रमाणात साजरे होतात.

देवी महात्म्य

हिंदू संस्कृती प्रमाणे कुलस्वामी आणि कुलस्वामिनी दोन्ही दैवतांची पूजा व्हावयास हवी.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोल्हापूर येथे श्रीमहालक्ष्मीचा सदैव वास असतो. भगवान परशुरामांची आई रेणुकामातेचे अधिष्ठान असलेले मातापूर (माहूरगड) हे दुसरे शक्तीपीठ आहे. तुळजापूर हे तिसरे पीठ असून सप्तशृंग (वणी) हे अर्धपीठ आहे. या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी असलेल्या शक्ती स्थळांची संक्षिप्त माहिती....

लोककथा

श्रीखंडोबा हे सर्व सामान्य जणांचे दैवत असल्याने, या दैवाताच्या अनेक लोककथा    लोकप्रिय आहेत. एखादी घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी आणि त्याचे महत्व वाढविण्यासाठी ज्या कथानुरूप गोष्टींची निर्मिती होते ती लोककथा. यांचे कोणत्याही प्रकारचे निश्चित पुरावे नसतात, याचे कुठलेही लिखाण नसते, आणि यामध्ये सांगणारा आपल्या सोयीप्रमाणे त्यामध्ये बदल करतो त्यामुळे मूळ ढाच्याबरोबरच अनेक उपकथा निर्माण होत असतात.अशा श्रीखंडोबा संदर्भातील काही लोककथा.....

कला व संस्कृती

श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनहीप्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभाशाली लखलखत्या हि-यांमुळे,अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते. अनेक लहान मोठे कलाकार या नगरीमध्ये जन्माला आले, वाढले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जेजुरनगरीचे जगभर गाजविले. शाहिरी, गायन, तबला आणि ढोलकी वादन, हार्मोनियम, चित्रपट, नाटय आणि तमाशा अशा सर्वच कलाप्रकारामध्ये जेजुरीचे तारे चमकले आणि अजूनही त्यांची घोडदौड तशीच चालू आहे.

 

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

मल्हार वारी

पूर्वीचे सुकृत फळा, आले हो शेवटी
मलुनाम हे अक्षर भळा, लिहिले लल्लाटी
माझे सहस्त्र अपराध, देवा घालावे पोटी
करा कृपेची छाया जागा द्या, मज पायाजवळी
हेच मागणे तुम्हा मागतो, नामा त्रिकाळी

श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत, अगदी राजापासून रंकापर्यंत या कुलदैवताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात. "देवा तुझी सोन्याची जेजुरी" असे या नगरीला संबोधले जाते, अशा या सुवर्णनगरीमध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचे महत भाग्य, आम्हाला याचा नक्कीच अभिमान वाटतो. गेले अनेक वर्षे ( दहा ते बारा ) आम्ही संगणकीय महाजालावर वावर करीत असताना जेजुरीविषयी आणि खंडोबाविषयी उत्सुकतेने शोधायचो, परंतु हाती काहीच लागत नव्हते.

श्री.अरुण कोल्हटकरांचा 'जेजुरी' काव्यसंग्रह किंवा अष्टविनायक सहलीमधील जेजुरी भेटीचा उल्लेख याव्यतिरिक्त जेजुरी विषयी अधिक माहिती मिळतच नव्हती. नक्की काय करायला हवे हे ही समजत नव्हते, अशावेळी आमच्या मदतीला धावून आले पत्रकार अमोल मचाले, त्यांनी सुचविले ब्लॉग, सोशल नेटवर्किंग आणि इतर संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्ही जेजुरीविषयी जास्तीत जास्त माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मग आमचा पुढचा प्रवास सुरु झाला, जिथे जिथे माहिती लिहिणे आणि पुरविणे शक्य होते तिथे तिथे आम्ही प्रकाशचित्रे, लेख, काव्य, स्तोत्र या माध्यमातून "जेजुरी" जगासमोर आणण्याच्या प्रयत्नात होतो.

२००६ साली पहिल्यांदा जेजुरीविषयी त्रोटक माहिती देणारा पाहिला ब्लॉग लिहिला. आणि तिथून सदैव नवनविन प्रयोग करून जेजुरीचे नाव सर्च इंजिनवर जास्तीत जास्त वेळा कसे येईल यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्रत्येकाने आपआपल्या परीने काम करून जेजुरी कशा पद्धतीने प्रकाशझोतात आणता येईल हाच ध्यास आमच्या मित्रपरिवाराने घेतला होता.

www.jejrui.in या परिवारामध्ये अनेकांचा सहभाग आहे आणि ज्ञात अज्ञात व्यक्तींचेही सहकार्य आम्हाला लाभले आहे, त्यासर्वांच्या ऋणात राहणेच आम्हाला आवडेल. श्रीमल्हारी म्हाळसाकांताने हे कार्य आमच्याकडून करून घेतले जे काही चांगले निर्माण झाले ते त्यांच्यामुळेच  आणि ज्याकाही  उणीवा राहिल्या असतील त्या आमच्यामुळेच हे सत्य आहे.
बहुत काय लिहिणे, हे कार्य घडावे ही श्रींची इच्छा......

जयमल्हार........ 

 

जेजुरी.इन परिवार 


 निर्मिती - संकल्पना - रचना - लेखन - संकलन - संपादन - व्यवस्थापन 

 

 

श्री. आण्णाश्री उपाध्ये गुरुजी. जेजुरी.

upadhyeguruji@gmail.com

www.facebook.com/upadhye.guruji

भ्रमणध्वनी : +919850150797


प्रकाशचित्र विभाग

श्री. स.बा.बारभाई. जेजुरी.   
( येळकोट जाहिरात )

श्री.घनश्याम कोलते,पिसर्वे. श्री.रा.ल.पवार, जेजुरी. श्री.ग.भि.टाक, जेजुरी. श्री.अमित पावशे,सासवड.


चित्र व रेखांकन विभाग

श्री. रि. श. पानसरे. जेजुरी.  श्री. सं. पां. उपाध्ये. जेजुरी.


आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.....

Bookmark and Share