Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

2919331

जयाद्री - निसर्ग संपदा

सह्याद्री पर्वत रांगेतील उपरांग असलेला जयाद्री निसर्गाने समृद्ध असलेला प्रदेश मागील काही पिढ्यांमध्ये दुर्लक्ष झाल्याने पर्यावरणाचा बराच -हास झालेला आहे, बेसुमार वृक्ष तोडीने डोंगर रांगा उजाड पडल्या आहेत.या परीसरातील विविध पक्षी प्राणी आणि निसर्ग संपदा याविषयी थोडक्यात पण महत्वाचे......


 

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

पक्षी

हळद्या ( Eurasian Golden Oriole )

कडेपठारी मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला जाताना डोंगरामध्ये काही ठिकाणी गर्द झाडी लागते तेव्हा ब-याचदा पिलोS SपिलोS S ...असा आवाज कानावर पडतो, नीट निरखून पाहिल्यास खंडोबाच्या भंडारासारखा गडद पिवळ्या रंगाचा पक्षी आढळतो, तोच हळद्या पक्षी. एरव्ही क्वचितच  दिसणारा हळद्या एप्रिल ते जुलै दरम्यान प्रजननाचा कालावधी असल्याने  हमखास दिसतो.
मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus असे आहे.नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचीत फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो.
फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीत विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रील ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्‍या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.कोतवाल (कोळसा) Black Drongo 


 

 

श्रीखंडोबा मंदिरामध्ये पहाटेच्या पूजेला हजेरी लावल्यानंतर प्रसन्न मनाने जेव्हा भाविक गडावरून सूर्योदयाचे विहंगम दृश्य पहात असतात तेव्हा बारद्वारी व पूर्वेकडील सज्जामध्ये कोळश्यासारखा काळ्या रंगाचा, साळूंखी एवढा पक्षी, ज्याची शेपटी टोकाकडे दुभंगलेली असते अशा पक्षांची लगबग चाललेली आपणास दिसेल ते नक्कीच कोतवाल असणार.
कोतवाल हा आकाराने बुलबुलपेक्षा मोठा असतो. त्याच्या शेपटीसह शरीराची लांबी १८ ते ३० सेंमी. असते. शेपटी लांब असून एका खोल भेगेने दुभागलेली असते. तसेच हे दोन भाग टोकाकडे बाहेर वळलेले असतात. चोच काळी असून तिच्या बुडाजवळ एक पांढरा ठिपका दिसतो. डोळ्यांचा रंग तांबडा असतो. नराच्या तुलनेत मादीचा रंग कमी तकतकीत असतो. आपल्या तकतकीत काळ्या रंगामुळे कोतवाल पक्ष्याला ‘कोळसा’ असेही नाव पडले आहे.
कीटक व त्यांचे सुरवंट हे कोतवालाचे भक्ष्य आहे. एखाद्या झाडाची वरची फांदी किंवा दूरध्वनीच्या तारा अशा सोईस्कर जागी बसून तो भक्ष्यावर पाळत ठेवतो. हवेतील किंवा जमिनीवरचा कीटक दिसला की, त्याला पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो व कीटकांचे तुकडे तोडून खाऊन टाकतो. गायबगळ्याप्रमाणे चरणार्‍या गुरांच्या पाठीवर बसूनही तो कीटक टिपतो.
कोतवाल हा पक्षी अतिशय चपळ असतो गोंगाट्या व भांडखोर असला तरी, तो गरीब पक्ष्यांना त्रास देत नाही. हिंस्र पक्ष्यांपासून आपल्या बरोबर तर पक्ष्यांच्या घरट्यांचे किंवा पिलांचे रक्षण करताना त्याचे वरील सगळे गुण प्रकर्षाने प्रकट होतात. हा पक्षी कावळ्याचा पाठलाग  करताना त्याला टोचा मारून हैराण करताना पुष्कळदा दिसतो. कावळ्यासारख्या लुटारू, लबाड आणि मोठ्या पक्ष्याचा देखील याच्यासमोर टिकाव लागत नाही. प्रसंग आला तर गरुड व ससाणा यांच्यावरही हल्ला चढवायला तो मागे-पुढे पहात नाही. होला,
ससाणा, घार, शिक्रा यांसारख्या शिकारी पक्ष्यांना घरट्याच्या आसपास फिरकू न देणारा त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पिटाळून लावणारा पक्षी म्हणून त्याला कोतवाल हे नाव मिळाले. त्याच्या कोतवालीमुळे मुनिया, वटवटे, चष्मेवाला, शिंपी इ. छोटे पक्षी याच्या घरट्याच्या आसपास घरटी करतात.त्यामुळे त्यांना अनायासे संरक्षण मिळते.


खंड्या kingfisher

जेजुरीच्या वायव्येकडील जयाद्रीच्या डोंगरातून अनेक छोटे मोठे ओढे वाहत क-हा नदीला जाऊन मिळतात याच ओढ्यांवर अनेक ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. या पाण्याच्या आसपास झाडांवर किंवा तारेवर निळ्या पंखाचा पिवळ्या मोठ्या चोचेचा व आखूड शेपटीचा हा पक्षी पाण्यामध्ये सूर मारून मासा घेउन वर येतो हा पक्षी म्हणजे खंड्या होय. खंड्या चिमणीपेक्षा किंचित मोठा असून त्याच्या शरीराची लांबी सु. १८ सेंमी. असते. डोक्याच्या वरचा भाग निळा व त्यावर आडव्या काळ्या रेषा असतात. पाठ तकतकीत निळी व पंख हिरवट निळे असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर विटकरी, निळा आणि पांढरा रंग असतो. हनुवटी व गळा पांढरा आणि पोटाकडील भाग विटकरी असतो. चोच लांब, जाड, काळी व टोकदार असते. पाय आखूड व लाल रंगाचे असतात. शेपूट आखूड असते. बाह्य स्वरूपावरून नर व मादी वेगळे ओळखता येत नाहीत.

मासे हे खंड्याचे आवडते भक्ष्य आहे. त्यामुळे नदी, ओढे, तळी यांच्या काठी तो हमखास दिसतो. मासे पकडण्याची त्याची पद्धत विलक्षण असते. झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा लव्हाळ्याच्या झुडपावर बसून तो भक्ष्य टेहळीत असतो. मधूनमधून आपले डोके हलवीत ‘क्लिक्’, ‘क्लिक्’ किंवा ‘किल्’, ‘किल्’ असा आवाज काढतो. पाण्यात मासा दिसताच तिरकस सूर मारून मासा चोचीत पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो व त्याला गिळतो. माशांखेरीज कीटक, खेकडे व बेडकांची पिले तो खातो. हवेत उडणारे कीटक हा मोठ्या चपळाईने पकडतो.नील पंख / चाष indian roller

बरथळ किंवा भोरवाडी कडे असणा-या उघड्या माळरानात तारांवर किंवा झाडांवर निळसर रंगाचा पक्षी आढळतो, याचा कंठ करडय़ा रंगाचा असतो. हा पक्षी  उडताना सुंदर निळसर-पांढऱ्या-काळ्या रंगाची नक्षी पंखावर दिसून येते. पंखा वरचा  नीळा रंग अतिशय सुंदर दिसत असल्याने याला नीलपंख असे नाव मिळाले आहे..खाद्यात मुख्यत: कीटकांचा समावेश असून कधीकधी सरडय़ांसारखे प्राणीही खातो. मार्च ते मे दरम्यान, झाडाच्या नैसर्गिक ढोलीत घरटे तयार करतो. ही घरटय़ाची जागा वारंवार विणीसाठी वापरत असल्याचे आढळून आले आहे. ३-४ पांढऱ्या रंगाची अंडी घालतात. नर-मादी दोघेही पालकत्वाची जबाबदारी पार पाडतात.


खाटिक shrike

 धावडदरा, देवदराकडे जाताना रस्त्याच्या कडेला मोठ मोठे काटे असणा-या बाभळीच्या झाडांवर नीट निरखून पाहिल्यास काट्यामध्ये  छोटे मोठे कीटक पाली सरडे नाकतोडे खोचून ठेवलेले आढळतात. जवळपास शोधल्यास झाडाच्या शेंड्यावर बसलेला पोटाकडे पांढरट रंग व पाठीकडे राखाडी तसेच डोळ्याजवळ जाड काळी रेषा, असा मैनेच्या आकाराचा पक्षी आढळतो.त्याला खाटिक किंवा गांधारी असे म्हणतात. याचे खास वाशिठ्य म्हणजे हा स्वतःचे खाद्य (कीटक) मारल्यावर लगेच न खाता, खाटिक ज्याप्रमाणे मांस टांगून ठेवतो,त्याप्रमाणेच हा पक्षी सुद्धा भक्ष्य बाभळीच्या काट्याला टोचून ठेवतो, त्याच्या या कृतीनेच याचे खाटिक हे नाव अगदी योग्य असे वाटते. महाभारतातील गांधारीने अंधपती धृतराष्ट्राची सोबत करण्यासाठी आयुष्यभर आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती त्याप्रमाणेच या पक्ष्याच्या डोळ्यावर गर्द काळी रेषा असल्याने याला गांधारी असेही म्हणतात.


सातभाई grey babbler

 
जेजुरी गावाच्या आसपास कुठेही फिरताना माळरानामध्ये किंवा डोंगर पायथ्याला क्या....क्या....क्या.... असा एक सारखा सुरात आवाज ऐकू येतो, आवाजाच्या दिशेने पहिले असता तारेवर किंवा झाडाच्या शेंड्यावर तपकिरी करड्या रंगाचा व लांब शेपूट असलेला पक्षी दिसतो तो म्हणजे सातभाई. हा पक्षी  दिसायला सुंदर असतो. आकार बुलबुल पेक्षा थोडा मोठा असून पिंगट रंग, पांढरी छाती, पाठिवरची नक्षीदार पिसं, गळा आणि लांब शेपूट ओळख पटवायला मदत करतात. आकशात उडाल्यानंतर आपल्याला समजते हा एकटा दुकटा नसून त्याच्या आसपास झाडांवर सात तें पंधराच्या संख्येमध्ये याचे भाऊबंध आहेत आणि ते एकच वेळी आकाशात विहार करतात. याच्या नावामागे एक कुतूहल आहे ते म्हणजे पूर्वी पक्षी निरीक्षकांना हे बहुतांश वेळा सात या संख्येने दिसल्यानेच याला मराठीमध्ये सातभाई तर इंग्लिश मध्ये सेव्हन सिस्टर्स या नावाने ओळखले जाते.  खाद्यात किटक, धान्य यांचा समावेश असतो. साधारणत: मार्च ते जुलै दरम्यान, गवताचे सुंदर कपासारखे घरटे तयार करून त्यात ३ किंवा ४ हिरवट निळ्या रंगाची अंडी घालतात. नर-मादी मिळून पालकत्वाच्या जवाबदाऱ्या सांभाळतात.  तांबट copper smith / barbet

 Placeholder Imageलवथळेश्वर परिसर किंवा गोपीचा ओढा परिसरामध्ये उंच झाडांवर ठोक ठोक असा मोठा एकसारखा आवाज येत असतो, जणू काही जवळपास तांब्याची भांडी बनविण्याचा कारखाना आहे. परंतु झाडाच्या शेंड्यांवरून येणारा हा तांबट पक्षाचा आवाज असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्व लक्षात येते.डोक्यावर तांबूस लाल रंगाचा ठिपका आखूड चोच आणि  छोटी शेपटी डोळ्यांच्या वर व खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा आरीयुक्त अंतर्भाग असतो. पक्ष्याच्या नर-मादीत फारसा फरक नसतो. तांबट पक्ष्याचे पिल्लू हे हिरव्या रंगाचे असते, परंतु त्याच्या डोक्यावर व छातीवर लाल रंग नसतो. तांबट  पक्षी वड, पिंपळ, चिंच, जांभूळ यांच्या फाद्यांमध्ये भोक पडून घरटे करतो.


वेडा राघू small green bee-eater


कवाडखिंडी कडे जाणा-या वाटेवर अनेक छोटी मोठी झाडे लागतात यातल्या काही झाडांवर चिमणीच्या आकाराचे सुंदर हिरवट रंगाच्या पक्षांचा थवा दिसतो.  हवेत वेडे वाकडे सूर मारून कीटक पकडणारा व तारेवर बसून मटकाविणारा, याच वेडय़ावाकडय़ा सूर मारण्यामागचे कारण लक्षात न आल्याने त्याच्या हालचाली, वेडय़ासारख्या दिसतात म्हणून याचे नाव वेडा राघू. 
टोकदार लांब
काळी चोच, सुंदर पोपटी-हिरवा रंग, डोळ्यांवरची ठळक काळी पट्टी आणि शेपटीमागच्या भागात असलेलं टोक या सगळ्या गोष्टींमुळे लगेच ओळख पटते. फेब्रुवारी ते मे दरम्यान नदी-नाल्याच्या काठावरच्या भिंतीमध्ये लांब बोगद्यासारखे छिद्र तयार करून त्यामध्ये ४ ते ७ पांढऱ्या रंगाची अंडी घालतात. नर-मादी मिळून पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात.


कोकीळ koel

वसंत ऋतू च्या आगमनाची कुहू कुहू ने चाहूल करून देणारा काळ्या रंगाचा कावळ्याच्या आकाराचा हा पक्षी मोठ्या झाडांवर दिसतो. कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो तो नर कोकिळ पक्ष्याचा. हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. साधारणपणे कावळ्याएवढा आकाराचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकिळ पक्ष्यांचा वीणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाही तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाही. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी तिला दिसेल अशा कोण्त्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी सोडून जाते.


हुदहुद hoopoe


जेजुरी गावाच्या अग्नेय दिशेला असलेल्या रमणा परिसरामध्ये झाडांवर आढळणारा पिवळसर तपकिरी रंगाचा तसेच पाठ व पंखांवर काळ्या पांढ-या रंगाचे पट्टे असतात आणि सुई सारखी लांब चोच असलेल्या पक्षाचे नाव
हुदहुद असे आहे. अनेकदा याच्या लांब चोचीमुळे सुतार पक्षी असल्याचा गैरसमज निर्माण होतो परंतु  दोघांमध्ये विभिन्न वैशिष्ठे आहेत. डोक्यावरचा सुंदर तुरा नाचवीत इकडे तिकडे नाकतोडे, टोळ, वाळवी, मुंग्या व किडे मटकाविणारा हा पक्षी शेतक-यांचा मित्र बनून राहतो.


पिंगळा spotted owlet

आम्ही लहान असताना आजी आम्हाला नेहमी म्हणायची, "खेळायला मित्राकडे जातो आहेस परंतु पिंगळावेळ होण्याच्या आत घरी ये " त्यावेळी तिन्हीसांजेला पिंगळावेळ का म्हणतात हे समजत नसे परंतु जसे जसे वय वाढत गेले तेव्हा याचा अर्थ उलगडत गेला.
सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस चिंचेच्या बागेकडे किंवा कडेपठार रस्त्याला फिरायला जाताना तारांवर किंवा झाडाच्या फांद्यांवर ब-याचदा राखट तपकिरी रंगाचा, अंगावर पांढरे ठिपके व गोल चेहरा त्यावर दोन मोठे डोळे घुबडाच्या कुळातील पक्षी दिसतो तो म्हणजे पिंगळा. हा पक्षी निशाचर असल्याने दिवसा सहज दिसत नाही दिवस मावळल्यानंतर हा शिकारीसाठी बाहेर पडलेला आढळतो याच कारणास्तव तिन्हीसांजेला पिंगळावेळ म्हणतात.
भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पिंगळा हा पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे.पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा (२१ सें. मी.) असतो. याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या ठिपक्यांवरूनच याला ठिपकेवाले घुबड असेही म्हणतात. याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त तर डोळे पिवळे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजुंनी १८० अंश फिरवु शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकुल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.

ब्राह्मणी मैना

"ब्राह्मणी मैना" असे नाव असणारा मी एक पक्षी आहे. आता मैना ठिक आहे; पण त्यापाठीमागे ब्राह्मणी शब्द पाहून तुम्ही नक्कीच चक्रावला असाल. पक्ष्यांमध्येसुद्धा ही जातीची टक्केवारी वगैरे प्रकरण असते की काय? अशी शंकाही तुमच्या मनात नक्कीच आली असेल.

तर तसे मुळीच नाही. माझ्या काळ्या चकचकीत डोक्यावर असलेल्या काळ्या शेंडीमुळे मला हे नाव मिळाले आहे. याशिवाय माझ्या डोक्यावर भांग पाडल्यासारखी काळी पिस असतात, म्हणून मला "भांगपाडी मैना" असही म्हणतात. माझ्या शरिराचा वरील भाग राखी रंगाचा तर खालील भाग तांबूस पिवळसर रंगाचा असतो. माझ्या पंखांना छान काळ्या कडा असतात. तर शेपूट पिंगट रंगाची असून तिच्या टोकाची पिसे पांढरी असतात. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे माझी चोच तिरंगी असते. चोचीचा पुढचा भाग पिवळा, मधला हिरवा तर शेवटचा भाग निळ्या रंगाचा असतो. माझे पाय पिवळ्या रंगाचे तर डोळ्याची बुबुळे हिरवट रंगाची असतात.

अशा अनेक रंगाच्या नजराण्याबरोबरच मला सुमधूर आवाजाची देणगी लाभली असल्याने पूर्वी मला पिंजर्‍यात पाळले जात असे. पण खर तर मला बागा, झुडुपे, विरळ जंगले, येथे वास्तव्य करायला फार आवडते. आंबा, पिंपळ, चिंच, जांभूळ, कडुलिंब, अशा झाडांच्या ढोलीत किंवा मंदिरे, पॅगोडा, उंच कौलारू इमारतींच्या कौलांमध्ये मी घर बांधते. सुरक्षिततेच्या दृष्टिने आम्ही जमिनीपासून बारा ते पंधरा फूट उंचावर घर बांधणे पसंत करतो. सुकलेल्या पानांच्या थरावर बारीक गवत आणि मऊ पिस, लाकडाचा भुसा वापरून मी माझ्या ढोलीत छान गादी तयार करते. मे ते जून  या महिन्यात माझ्या या ढोलीत तुम्हाला निळसर हिरव्या रंगाची अंडी दिसतील. कारण हा काळ आमचा विणीचा काळ असतो. या अंड्यातून साधारणतः बारा-पंधरा दिवसांनी पिल्ल बाहेर येतात. आम्ही दोघे मिळून त्यांचा सांभाळ करतो. आमच्या नावात ब्राह्मणी शब्द असला तरी आम्ही मिश्र आहारी आहोत. विविध फळ, फुलातला मधुरस, याबरोबरच कीटक खाणेही आम्ही पसंत करतो.वड, पिंपळ,सिताफळ, अशा फळांबरोबर छोटे सरडे,पाली यांचा आस्वाद  घ्यायला आम्हाला खूप आवडते.

कथा एका भरकटलेल्या युवराजाची

एक होता राजा नव्हे महाराजा न एक होती महाराणी आणि सोबत युवराजसुद्धा, तिघेही गुण्यागोविंदाने राहत होते.  दिवस आनंदात, सुखात जात होते, छोट्या युवराजला वाढविण्यात दोघांचाही छान त्यांचा वेळ जात होता, युवराजला बाहेरच्या जगाची अजून माहिती नव्हती राजाराणी आणि आपले घर इतकेच त्याचे विश्व. एक दिवस युवराजच्या मनामध्ये बाहेरचे जग पाहण्याची इच्छा निर्माण झाली मग त्याने भर दुपारीच राजा राणी दोघेही नसताना घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण वेळ चुकली होती अजून मुक्त आकाशात भरारी घेण्याचे बळ त्याच्या पंखामध्ये नव्हते. तो वाट चुकला आणि घराकडे परतण्याचा रस्ताही त्याला मिळेना. राजाराणीने त्याचा शोध घेतला परंतु हाती अपयश आले, इकडे युवराज अनोळखी जगतामध्ये राहत होता. तो राजकुमार असल्याची खून पटत होती त्याला अनेकांनी सांभाळून घेतले होते. दिवसामागून दिवस जात होते, कालांतराने एका सदगृहस्थाने युवराजला ओळखले आणि त्याला त्याच्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. परंतु सहज सर्वकाही सुरळीतपणे पार पडावे असे नियतीच्या मनामध्ये नव्हते. राजा आणि राणीने युवराजला ओळखण्यास नकार दिला त्याचे बदललेले रंगरूप त्यांना भावले नाही त्यांनी युवराजला घराबाहेर काढले. पुन्हा त्याची घरी पाठवणी करण्यात आली मात्र राजाराणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी युवराजला स्वीकाराले नाही.... 
राजा राणीने  नाकारलेला युवराज बंदिस्त झाला कि मुक्त निसर्गामध्ये वाढला
युवराजाचे पुढे काय झाले ?
भरकटलेल्या युवराजाची कथा जाणून घेण्यासाठी...

नाराच गरुड bonellies eagle

श्रीक्षेत्र जेजुरीच्या नैऋत्येकडील जयाद्रीच्या कडेपठार डोंगरांमध्ये नाराच गरुडाचे घरटे उंच झाडाच्या शेंड्यावर, कडेकपारीत किंवा सुळक्यावर बांधलेले असते. अशा ठिकाणी इतर प्राणी सहजासहजी जाऊ शकत नाहीत. घरटे १.५ ते २ मी. व्यासाचे, मोठ्या आणि बळकट काटक्यांनी तयार केलेले असते. त्याची आतील बाजू पाने, नारळाच्या शेंड्या, कीटकांना पळवून लावणा-या कडूलिंब, निलगिरी सारख्या वनस्पतीच्या पानांनी आच्छादलेली असते. प्रजननाचा काळ नोव्हेंबरपासून एप्रिलपर्य़ंत असतो. मादी दोन ते तीन अंडी घालते. अंडे सुमारे ७५ मिमी. व्यासाचे, पांढरट रंगाचे आणि तपकिरी ठिपक्यांचे असते.  

नाराच गरुड सर्व पक्षी वर्गामध्ये राजा असून ससे घोरपडी साप कोंबड्या यासारखे याचे खाद्य आहे. आकाशात खूपच उंच उडत असतानाही तो आपले भक्ष्य पकडण्यासाठी हवेत सूर मारून वेगाने खाली येतो आणि नख्यांच्या मदतीने तो भक्ष्य पकडतो. हा पक्षी साप, सरडे, पक्षी, ससे, घुशी, उंदीर यांना पायात घट्ट पकडून आणि उचलून नेतो व खातो. तो मोठे कीटक व मृत जनावरांचे मांसही खातो. त्यामुळे तो परिसर स्वच्छ राखण्याचे काम करतो. भक्ष्याची शिकार फक्त दिवसा करतो. लहान कोकरू उचलून नेण्याएवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते. प्रजननाचा काळ  डिसेंबरपासून जानेवारीपर्य़ंत असतो. मादी दोन ते तीन अंडी घालते. मध्ये हा काळ अंडी व पिलांचा आहे याच काळात त्याचे निरीक्षण करणे सहज शक्य होते. घरट्यामध्ये मादी अंडी उबविते. अंड्यांतून ४३-४५ दिवसांनंतर पिले बाहेर येतात. नर व मादी दोघेही पिल्लांना भरवितात. ते ६६-७५ दिवस पिलांची काळजी घेतात. कारण त्यांची पिले दिर्घकाळ अन्नासाठी व रक्षणासाठी त्यांच्यावर अवलंबून असतात. एखादा शिकारी पक्षी घरट्याकडे चाललेला दिसताक्षणी नर व मादी खाली झेपावून त्याला पिटाळून लावतात. गरुडाची जोडी एकच घरटे अनेक वर्षे वापरते. दरवर्षी केलेल्या नव्या डागडुजीने घरटे मोठे होत जाते.

येथील घरट्यातील पिल्लू भरकटले होते, काही काळानंतर पुण्यातील पक्षीतज्ञ डॉ.सतीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण प्रेमींनी त्याला पुन्हा घरट्यामध्ये ठेवले. परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्याची वाढ झाल्याने तसेच रंगरूप बदललेले असल्याने गरुडाच्या जोडीने त्या युवराजाला (पिलाला) स्वीकारले नाही आणि घरट्यातून खाली ढकलून दिले, घरट्यामध्ये पिलू दिसत नाही हे पाहून श्री.अमित पावशे आणि कार्यकर्त्यांनी शोध घेऊन पुन्हा पिलाला घरट्यामध्ये ठेवले पुन्हा तेच घडले.असा प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर डॉ.पांडेंनी नैसर्गिक वातावरणामध्ये दुसरीकडे पुनर्वसन करता येईल का ? असा विचार केला आणि इतर पक्षीतज्ञांशी संपर्क साधला. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील गरुडाच्या घरट्यामध्ये साधारण त्याच वयोमानाचे पिलू असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी घाईने पुनर्वसन करण्यासंदर्भात हालचाली केल्या. वनखात्याचे अधिकारी आणि काही कार्यकर्ते असा सारा लवाजमा युवराजासाठी कोल्हापूरच्या दिशेने निघाला. पन्हाळा येथील घरट्यामध्ये त्या पिलाचे पुनर्वसन केले, तेथील गरुडाच्या जोडीने या दत्तकपुत्राला स्वीकारले आणि त्याचे संगोपन चालू केले, असे दोन दिवस निरीक्षण करून  कार्यकर्ते परतीच्या प्रवासाला निघाले. अशारीताने एका भरकटलेल्या राजकुमाराला निसर्गप्रेमींच्या दक्षतेमुळे पुनर्जीवन प्राप्त झाले. या संपूर्ण घटनांवर डॉ.पांडेंचे निबंध अंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांचे आणि त्यांच्या सहका-यांचे सर्वत्र कौतुक झाले.


बिनविषारी साप

Placeholder Imageकवड्या wolf snake

काळा किंवा तपकिरी रंग शरीरावर पांढरे किंवा पिवळे आडवे पत्ते डोक्याकडे गडद व शेपटीकडे फिकट होत जातात
दोन ते सव्वा दोन फुट पर्यंत लांबी अन्न पाली, लहान सरडे ,
वैशिष्ठ्य घराच्या भिंतीवर फटीतून किंवा पाईप चा आधार घेऊन तिस-या मजल्यापर्यंत चढू शकतो
अत्यंत तापट व कड कडून चावणारा


Placeholder Image

वाळा worm snake

लालसर काळा किंवा तांबूस तपकिरी चकचकीत रंग
१५ ते २० सेमी लांब भारतातील सर्वात लहान साप
जमिनीखालील असून फक्त पावसाळ्यात जमिनीवर येतो झाडाजवळ पालापाचोळयात आढळतो
डोळे लहान असल्याने आंधळा साप असे नामाभिधान
जगभर आढळतो


Placeholder Image

गवत्या grass snake

निस्तेज हिरव्या रंगाचासाप , पिलाच्या हिरव्या रंगावर काळे पट्टे
दोन ते तीन फुटापर्यंत वाढतो
बेडूक व पाली हा  साप अतिशय शांत वृत्तीचा असून चावल्याचे एकही उदाहरण नाही


Placeholder Image

तस्कर trinket snake

तपकिरी रंगावर डोक्यापासून शरीराच्या अर्ध्या भागापर्यंत काळ्या व पांढ-या रंगाचे पट्टे असतात
 ३ ते ४ फुट लांबी
पाली उंदीर सरडे
शांत स्वभाव चीडल्यास इंग्रजी S चा आकडा करून चावण्याचा प्रयत्न करतो


Placeholder Image

डुरक्या घोणस sand boa

पांढुरक्या रंगावर काळपट तपकिरी रंगाचे ठिपके असतात
लांबी २ ते अडीच फुट पर्यंत
उंदीर पाली सरडे पक्षी
या सापाला अजगराचे पिल्लू समजले जाते याची शेपटी कानसी प्रमाणे खर खरीत असते हा साप अत्यंत चिडखोर वृत्तीचा


Placeholder Image

मांडुळ   earth boa

लालसर तपकिरी चमकदार रंग
लांबी ३ ते साडेतीन फुटापर्यंत
उ प स
जमिनी खाली वास्तव्य याचे तोंड व शेपटी एकसारखे असते त्यामुळे याला दुतोंडी साप म्हणतात
शांत स्वभाव पावसाळ्यात हमखास रस्त्यांवर दिसतो


Placeholder Image

दिवड checkered keel back

लाल हिरवट व काळपट या रंगावर बुद्धिबळाच्या पटासारखी नक्षी
३ ते ४ फुट
डबकी नाले तळी नद्या व पाणथळ जागे मध्ये आढळतो
पाण्यातील बेडूक मासे
चिडखोर स्वभाव डीवचल्यास कडकडून चावतो


Placeholder Image

धूळ नागीण banded racer

गडद तपकिरी रंग नागासारखा दिसतो
४ फुटापर्यंत आढळतो
हा साप अत्यंत चपळ असून हातात पकडल्यास वळवळतो चिडतो नंतर शांत होतो
पा उ


Placeholder Imageधामण rat snake

तपकिरी काळा पिवळा अश रंगांमध्ये आढळतो तोंड छोटे असून अंग जाडजूड असते तोंडाच्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा असतात
१० ते १२ फुट
हा साप अत्यंत चपळ असून घराजवळ अंडी किंवा उंदीर ख्ण्यासाठी घरामध्ये येतो याचे मुख्य अन्न उंदीर असल्याने याला शेतक-यांचा मित्र म्हणतात
खूप भित्रा  पकडल्यास दुर्गंधी सोडतो किंवा संडास करतो


Placeholder Image

कुकरी banded kukri snake

हिरवट रंगावर काळ्या रंगाचे आडवे पट्टे डोक्यावर  v खुण
लांबी २ ते साव्व्दोन फुट
अतिशय शांत स्वभाव सहसा चावत नाही
पा उ  साप सुरळी


विषारी साप

Placeholder Imageफुरसे saw-scaled viper

तपकिरी रंगावर पांढरी जाळीदार नक्षी
एक ते दीड फुटापर्यंत
विंचू पा सरडे
याचे खवले करवतीच्या दात्याप्रमाणे
चिडल्यावर शरीराचे वेटोळे करून खास खास आवाज करतो
दगडी माळराने यांवर आढळतो


Placeholder Image

घोणस russells viper

पिवळा किंवा तपकिरी रंगावर गोलाकार धब्बे तोंड त्रिकोणी अंग जड जुद शेपटी आखूड
४ते ५ फुटापर्यंत आढळतो
उ घुशी बेडूक
चिडखोर स्वभावाचा याच्या  जवळ गेल्यास स्वताचे शरीराचे वेटोळे करून कुकरच्या शिट्टी सारखा मोठा आवाज काढतो
घोणस साप अत्यंत घटक असून हल्ला करताना काही क्षणात कोणत्यही दिशेने हल्ला करतो
याचे मोठे दात घडीचे असून दंश करताना उघडून जखम करतो यावे ळी दात तुटल्यास पुढचे दोन दात तयार असतातPlaceholder Image

हिरवा घोणस bamboo pit viper

पोपटी रंगावर काळी पंढरी नक्षी तोंड त्रिकोणी  सडपातळ अंगाचा खालचा भाग पिवळा असतो
२ ते अडीच फुट  
झाडावर राहणारा पक्षी पिले व अंडी
विषाचे प्रमाण अत्यंत कमीPlaceholder Image

मण्यार commonkrit

निळसर काळ्या रंगावर पांढरे आडवे पट्टे शेपतापासून अर्ध्या अंगापर्यंत असतात तोंदापुधील भाग गुलाबी असतो  
निशाचर   शांत वृत्तीचा
२ ते ३ फुट
मण्यार या सापाचे मुख्य अन्न साप असल्याने आपल्या घराजवळ येतो
नागापेक्षा पंधरा पट विषारी दात अत्यंत छोटे चावलेला काळात नाही सूज येत नाही भारतातील सर्वात विषारी सापPlaceholder Image

नाग indian Cobra or Comman Cobra

पिवळा गर्द तपकिरी काळपट रंग फण्याच्या मागे मोडी लिपीतील १० चा आकडा
५ ते साडे ५ फुट लांब
उ बे पक्षी
पुरातन काळापासून नागाची देवता म्हणून पूजा करतात नागपंचमीला पूजन
फना काढणारा एकमेव साप 


500;500;cd26c9de597fa66287f9366213611f73a99914af500;500;d5f71f0c861d9932e9f380844dae8e30c58369b4500;500;0f1bb8c33ef5d75c90f69bd3a621131285d0235f500;500;b74cdb269bb24baebb3fdbb4be519a7f655c3a87500;500;44edcd149967c182ead5d36ef901f9f1557535fc500;500;3f3f8afe909cc36bfbb9d46f5692ec466abda731500;500;fcf2c339543efcfba1b2d15ec2c4ea3b57fa2e47500;500;01471f235f1c0a064b567992c8ec3d8906f5cbbf500;500;6c77f8856057e70025b03cb9e6a50a9807fa3ce4500;500;795da6b16dba0a9110751e87246fdac257a811d4500;500;3fb8317550dab42cfb74a1cc6278a484234a07c5500;500;9a6fbdb0287b5befac96826c2c24587b9657418f500;500;bfaa58cf9807d7747803363ad16e896a9dc63a03500;500;a7ec8cc141aff8bd870255fffd7d0ec521c20500500;500;158371bdd130c180ce80b60faf77424ec37e4227500;500;2b0494a88bfc72d185f545fea26d61c241743822500;500;034444d716e82f582cdaece29e98bf152e4a705a500;500;6386ef2364d4e15a9180d5e2742f82955a8dfa00500;500;21ca9a6445d0f5ea6123a173dd4e5595a780933f500;500;c3438ddd15eb392c6ab378dc34abfcc87e0aa691500;500;5ff03c97fcb114952f56e7456371d231058d73fe500;500;70163af3b1b0f7284ea78a637140e8bc683e68f1500;500;2214f29ea20c5c3b04f3fd9da99c9b43e6f99dbd500;500;200511fe30c9c0fe09d9d1e58a36d14a1a9972ee500;500;e85739b7fa2fcce25d3cf1e9d42b3ca78c0d435a500;500;95bf61ce36195a281091ba594f2ca25f9026069f500;500;7af25a49ae483c4402ec479137eeebef11cd4a31500;500;65be1e3f40d8337b0ba96769c41c70ad271a8659500;500;891e2e2242b4e5ea265ed8f8186c88c49fae5606500;500;e8cef503b7ac2d83c631055d3f871b0b57478043500;500;fcf3afb02d222445692708f3eac6760972061f07500;500;9e442a87d07413a1c77e7bd013de07f52f8cc1df500;500;268ddce3e82b8d16ca3bb3a3f3943cd231c586c1500;500;1426797f3850db58687593fe274ba3562ab6cbe3
Bookmark and Share