Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

जेजुरगड

जेजुरगड श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्यानंतर त्याने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्लाचे नाव घेतले जाते तर मणीसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊया.

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

जेजुरगड पर्वत शिव लिंगाकार
मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर

नाना परीची रचना रचिली अपार
जळी स्थळी नांदे स्वामी शंकर ll

-- नरहरी सोनार

मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्या नंतर त्यने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्ला चे नाव घेतले जाते तर मानिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊ या.     
जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी-मार्तंडाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीनबाजूनी  पायरीमार्गांनी जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पाय-या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितील असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस पुर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढविली आहे. या पायरी मार्गावर तीनशे पंच्याऐंशी पाय-या आहेत तर सुस्थितील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशे दीपमाळा आहेत. Imperial Gazetteer of India 1885 नुसार या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्या त्यापैकी दोन कमानी भग्न अवस्थेत पहावयास मिळतात. जेजुरगडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा ( दगड ) संदर्भात हा उल्लेख आलेला आहे.
पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते.त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके  भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते.त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत. सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाच्या उजव्या हाताला संगमरवरी यक्षाची मूर्ती दिसते तर डावीकडील बाजूस दगडात कोरलेला गणपती आहे.मुख्य गर्भागृहाम्ध्ये प्रवेश करताना समोर दिसतो तो मेघडंबरीतील भव्य मोठा देव्हारा. समोर खालील बाजूस श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभूलीग दिसते, श्रीखंडोबा स्वयंभूलिंग हे म्हाळसा स्वयंभू लिंगापेक्षा आकाराने मोठे आहे, त्याला लागुनच पाठीमागील बाजूस बाणाईचे लिंग आहे, त्याच्या बाजूला गणेश मूर्ती, पितळी कुत्रा व श्रीखंडोबा म्हाळसा उत्सव मूर्तीचे दोन जोड आहेत. त्याच्या पाठीमागील कट्ट्यावर श्रीखंडोबा म्हाळसाचे तीन मूर्ती जोड पहावयास मिळतात त्यापैकी दोन मोठे मूर्तीजोड प्रभावळीसह आहेत. डावीकडील चांदीचा मूर्तीजोड नाना फडणविसांनी पेशव्यांना वारस मिळावा म्हणून केलेल्या नवसपूर्तीप्रित्यर्थ अर्पण केलेला आहे तर त्याच्या शेजारील छोटा मूर्तीजोड सातारकर भोसले छत्रपतींनी अर्पण केलेला आहे. उजवीकडील मूर्ती जोड तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील शरीफजीराजेंनी अर्पण केला आहे. या मूर्तींच्यापाठीमागे भिंतीतील मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची चतुर्भुज बैठी मूर्ती आहे, यांच्या आसनाखाली मणीसूर व मल्लासुर दैत्यांच्या शिरासोबत घोडा आहे. श्री मार्तंड भैरवाचे दोन्ही बाजूस देवींच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहात उत्तर व दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोली आहेत पैकी दक्षिणेकडील खोलीत देवाचे शेजघर असून त्यामध्ये देवाचा चौपाळा आहे. उत्तरेकडील खोलीमध्ये तळघर असून तेथे श्री खंडोबा बाणाई स्वयंभू लिंगाचे गुप्तमल्लेश्वर स्थान आहे ते फक्त महाशिवरात्रीस खुले असते.मंदिर प्रदक्षिणा मार्गावर त्रेसष्ठ ओव-या आहेत पैकी काही ओव-यांचे अलीकडील काळात बांधकाम करून खोलीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या पाठीमागील भिंतीमध्ये कोनाड्यात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे.प्रदक्षिणा मार्गावर तुळजाभवानी, पंचलिंग, भुलेश्वर, अन्नपूर्णा व साक्षीविनायक मंदिरे आहेत, तसेच गणेश मूर्ती,उमाजी नाईक तालीम, घृतमारी शिळा, मल्हार पद, मारुती आणि बारद्वारीतील देवघर व देवाची पालखी पहावयास मिळते. पंचलिंग मंदिराला लागुनच देवाचे भंडारगृह आहे, याठिकाणी देवाच्या उत्सवमूर्ती दसरा व सोमवती अमावास्येला बसविल्या जातात.

हेगडी प्रधान

मणीसूर व मल्लासूर या दैत्यांच्या युद्धावेळी मार्तंड भैरवाने विष्णुना आपले प्रधान म्हणून नेमले होते व मणीसूर दैत्य धारातीर्थी पडल्यानंतर त्याने केलेल्या स्तुतीमुळे मार्तंड भैरव प्रसन्न झाले व त्यांनी विष्णुना देवसेनेतर्फे मल्लासूराकडे शिष्टाई करण्यासाठी पाठविले होते. विष्णूनी केलेल्या शिष्टाईला यश आले नाही.

हेगडी प्रधान पुढे युद्धामध्ये मार्तंड भैरवाचे हातून मल्लासूराचा संहार झाला.विष्णूंचे अर्थात हेगडी प्रधानाचे मंदिर जेजुरगडावरील पायरी मार्गाच्या मध्यावर लागते.मंदिर साध्या बांधणीचे विना कळसाचे दगडामध्ये बांधलेले आहे.

या मंदिरामध्ये विष्णूंच्या दोन मूर्ती आहेत त्यावरून अनेकांना वाटते हेगडे व प्रधान दोन स्वतंत्र असावेत परंतु सत्यात प्रधान या शब्दाचे कानडी रूप म्हणजे हेगडे होय. ज्याप्रमाणे चांगभलं हे एकाच अर्थाच्या दोन शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एकच शब्द रूढ झाला आहे तसेच हेगडे + प्रधान यांचे बाबतीत हेगडी प्रधान हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. श्रीखंडोबा म्हाळसाईचे दर्शन घेण्यापूर्वी हेगडी प्रधानाचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते.

यशवंतराव

%u092F%u0936%u0935%u0902%u0924%u0930%u093E%u0935  गडकिल्ल्यांच्या उभारणी करताना त्यांच्या रक्षणासाठी यशवंतरावची निर्मिती केलेली असते तसेच जेजुर गडावरील महाद्वाराशेजारी तट बंदीत उभे असलेले महत्वाचे ठिकाण म्हणजे यशवंतराव. येथे वरच्या बाजूला दोन इंच व्यासाचे एक छिद्र आहे त्याविषयी आख्यायिका सांगितली जाते, औरंगझेबाने जेजुर गडावर स्वारी केल्यानंतर या छिद्रातून मोठे भुंगे बाहेर पडले व त्यांनी मोगलांवर हल्ला चढविला होता, तेव्हा औरंगझेबाने श्रीखंडोबाची माफी मागितली व सव्वा लाखाचा भुंगा वाहिला. या संदर्भातील रामदास स्वामींच्या एका पदामध्ये याचे वर्णन आलेले आहे, ते असे

महीपति कळेना गति पाहो जाता सामर्थ्य किती |
करामती दावी अजामती ।।
तुरुक मातले फोडाया गेले । भोंगे उठिले तेही पिटिले ।
कोणे नेणो मार्गी कुटिले ।।
श्वानासारिखी एक भुंकती । तोंडे वांकडी कंप सूटती ।
पिसाळले, विष्ठ भक्षिती ।।
हत्ती घोडे बहु मारिले । थोर लोक भूमी काढिले ।
तांति वाहणा बाजीद जाले ।।
 ऐसी हे लीळा कळे नकळा । कळा विकळा धाक सकळा ।
थोर थोर म्हणती पळा ।।
मल्लुखान देव मल्लारि । रात्रिभागी चाबुक मारी ।
तोंडे सुजती पैजारांवरी ।।
 गर्व  जाता ते बराबरी । संतोषता न्याहाल करी ।
दास म्हणे करा चाकरी ।।

यशवंतराव

दुस-या आख्यायिकेनुसार यशवंतराव गडाचे किल्लेदार आहेत व देवाच्याभेटीसाठी येणा-या भाविक भक्तांचे शारीरिक वेदना दूर करण्याची त्यांची शक्ती आहे. म्हणूनच भाविक याठिकाणी मोडलेल्या हात पायांचे दुखणे बरे होण्यासाठी नवस बोलतात व नवस पुर्तीनंतर लाकडी हात अथवा पाय तयार करून यशवंतरावला अर्पण करतात.

गुप्त मल्लेश्वर ( गुप्तलिंग )

गुप्त मल्लेश्वर ( गुप्तलिंग )मार्तंड भैरवाने बाणाई सोबत विवाह केला व चोरून तिला जेजुरगडावर तळघरामध्ये आणून ठेविले होते.तेथून ते महाशिवरात्रीला प्रकट झाले.अशी कथा गुप्त मल्लेश्वराविषयी "मार्तंड विजय" ग्रंथात सांगितली आहे. मुख्य मंदिरातील गर्भगृहा

मध्ये उजवीकडे व डावीकडे दोन खोल्या आहेत त्यापैकी डावीकडील खोलीत देवाचे शेजघर आहे तर उजवीकडील खोली बाहेरून रिकामी दिसते परंतु या खोलीमध्ये तळघर असून या तळघरामध्ये श्रीखंडोबा व बाणाईचे स्वयंभू लिंग आहे. हे गुप्तलिंग वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्री उत्सवामध्ये उघडले जाते एरवी ते बंदच असते. असेच एक लिंग शिखरामध्ये आहे तेसुद्धा महाशिवरात्रीलाच उघडते.

महाशिवरात्रीला जेजुरी येथे आल्यानंतर पाताळलोक, भूलोक व स्वर्गलोक या त्रैलोक्यामध्ये व्यापलेल्या परमेश्वराचे लिंगरूपाने दर्शन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पंचलिंग मंदिर

जेजुरी गडावरील मुख्य खंडोबा मंदिरा इतकेच महत्वाचे असलेले पंचलिंग मंदिर, मुख्य मंदिराचे पाठीमागे पश्चिमेकडे आहे. मार्तंड भैरवाने दानवांवर मिळवलेल्या विजयानंतर धवलगिरीच्या एका टेकडीवर राहण्याचा संकल्प केला त्यावर धर्मपुत्र सप्तऋषींनी पाच तीर्थक्षेत्र दर्शन एकाच ठिकाणी व्हावे यासाठी स्वयंभू प्रकट व्हावे अशी विनंती केली. त्याप्रमाणे पंचलिंग मंदिरामध्ये नीलाद्री, वाराणसी, मातापूर, हरिद्वार, मल्हार अशा पाच तीर्थक्षेत्र दर्शनाचे पुण्य मिळते.

दगडी बांधकाम असलेल्या मंदिराचे सदर व गर्भगृह असे दोन भाग पडतात,मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धारा संदर्भात शिलालेख आढळतो त्याप्रमणे या मंदिराचे काम विठ्ठल शिवदेव विंचूरकर ( सासवडकर )यांनी १७५६ मध्ये केले आहे.
ज्याला न घडे काशी, त्याने यावे जेजुरीशी अशी एक ओळ एका लोकगीतामध्ये आहे ती पंचलिंग मंदिरा संदर्भातील आहे, काशी इतकेचमहत्व या स्थानाला आहे. या मंदिरातील स्वयंभू लिंगावर अभिषेक पूजा केल्याने तीर्थाटनाचे पुण्य लाभते व कलियुगातील यातनांपासून मुक्ती मिळते अशी अनुभूती असल्याने भाविकांचा ओढा या मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्याकडे जास्त असतो.


श्रीक्षेत्र जेजुरगड मंदिरातील दिनक्रम

श्रीक्षेत्र जेजुरगड मंदिरामध्ये भविकांची दर्शनासाठी व कुळधर्म कुलाचारासाठी सदैव गर्दी असते सकाळी सात वाजल्या पासून रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. सर्वसामान्य भाविकांचे पूजनीय कुलदैवत असल्याने येथे अगदी देवाजवळ जाऊन दर्शन घेता येते. फक्त रविवार व यात्रेच्या दिवशी लांबूनच मध्यगर्भगृहातून दर्शन मिळते.
श्रीक्षेत्र जेजुरगड मंदिरातील दिनक्रम:
पहाटे पाच वाजता मंदिर उघडते, मंदिराची साफसफाई, पुजेची तयारी झाल्यानंतर साडेपाच वाजता 'तोंडधुनी'च्या पूजेला सुरवात होते. स्वयंभू श्री खंडोबा-म्हाळसा लिंगावर ग्रामस्थ व पुजारी देवाला पारंपारिक भूपाळी गाऊन स्नान घालतात. यावेळी स्वयंभू लिंगावर पंचामृत अभिषेक स्नान घालता येते. अभिषेक संपल्यानंतर आरती होते त्यानंतर मंत्र पुष्पांजली होऊन तोंड धुनी पुजेची सांगता होते.व सकाळी सात वाजल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होते.
दुपारी साडेबारा वाजता 'धुपारती' ची पूजा होते यावेळी देवाला शितजल स्नान व पंचामृत अभिषेक घातला जातो.
आरती झाल्यानंतर गुरव पुजारी देवाची पंचारती घेऊन गडावरील प्रदक्षिणा मार्गातील सर्व देवतांना तसेच अर्ध्या गडावर पायरी मार्गावरील बाणाई देवी व हेगडी प्रधानांना पंचा
रती ओवाळीत पुन्हा मंदिरात पोहोचतात, यावेळी गुरव पूजा-यांसोबत कोळी समाजातील देवाचे सेवक पाण्याची कळशी घेऊन तर घडशी समाजातील देवाचे सेवक कलाकार सनई व ढोल वाजवीत पंचारती सोबत चालतात.
सायंकाळी सहा वाजता म्हणजेच तिन्हीसांजेला बारद्वारीमध्ये सनई - चौघडा वाजविला जातो.
रात्री साडेआठ वाजता 'शेजारती'च्या पूजेला सुरवात होते यावेळी स्वयंभू लिंगावर उष्णजल व पंचामृताने स्नान घातले जाते. अभिषेक संपल्यानंतर देवाला सुगंधीत फुले व पत्रीची सेज सजविली जाते.त्यानंतर देवाची आरती होते.  आरती झाल्यानंतर पंचारती प्रदक्षिणा मार्गावर सर्व देवतांना ओवाळली जाते. फक्त शनिवार व रविवार धुपारती प्रमाणेच शेजारतीला  पंचारती बाणाई व हेगडी प्रधान मंदिरामध्ये नेली जाते.

450;375;8a3a75328db13ef1449e20249584a04d5e1c2c81450;375;e603e3ef9bec3f24b12cc3bb66a14458b4ad9b45450;375;247e0b8740fb968a97664e6fe6f5f6cd1af9887e450;375;6958d18dd092b479c59029b7940d016bf4063661450;375;2dc7f186ed48d96d9d31fcea8f4ab2fd4fbe6757450;375;c5c4ab4ad61a06ed84d00eec08076d47e642ab02450;375;262b59185e3aef31c39d5a2d0c2b2f5a31fab2fc450;375;4233823dbf3c8cf49a2afc880e66edff06ff9a0c450;375;b0cf95a0240a62db1de73248ee29e4a0233c4294450;375;01b2e0dff27ab40b5bf515b3edc7cb40ddc7c20f450;375;926397f0ebb4e33ce00ee76b7045ed31fc7b68d2450;375;3cf31fbeca91b899b4a2855eb0eee659ab77c8ce450;375;8d2abad3200960a48305f97f87934c1299685e8c450;375;013aee18f4bcffba9373b8966e3421974dac5da8450;375;24954365182349e46a47371be9aa65d0cced5fce450;375;c16d9a15e14a82563df66e4ddb360fcd40389d50450;375;1dd3b1fcb7cb63e3d2abf4bf43d44a4cddaf0124450;375;42e9b27ef91a92cc5ed03b9124a36b4bc127cf3d450;375;e433bfd7fc542484dbe09ee6a922d22c81fbb9b4450;375;e863e91f4ef8ab1c574d4672b1d562986b2af395450;375;fc6c783bfd2cf7816ba81c33ec00324f39003336450;375;f3292c55fcef19c48f9e87508a6c76dde18130cc450;375;9f54a58a88c5206310a51194bb043cdc65c912cf450;375;d536c0479b245a93689e3a93b8cb204ee7f73d24450;375;57f3ea1095490075369304346c9bc480d83c51db450;375;734d5c40b24a5cec9e3c1f9761b499da59b2ea17450;375;dc28757987293bb605286102fbbd88765c84b574450;375;c303eaf6fa3fa56c0788fd7908dd3f4e8c05639e450;375;c03b3a0e7371891aee135eefac8f02c478d5411e450;375;fd7eddc3f23c46ef5048339df82b4aa0cffe2fbf450;375;37206106fb7634af12d82977e76fd91d0f4cdb48
Bookmark and Share